आमगाव,दि.18 : तालुक्यातील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्याय कालीमाटी येथील मार्च २0२0 मध्ये झालेल्या एच.एस.सी. परिक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल १00 टक्के तर कला शाखेचा निकाल ९७ टक्के लागला. विज्ञान शाखेत एकूण ७४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी यशस्वी झाले. कला शाखेत एकूण ८९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ८३ विद्यार्थी यशस्वी झाले. विज्ञान शाखेतील पवन जैपाल गिहेपरुंजे ७७ टक्के घेऊन प्रथम रविंद्र गोपाल ऊके ७६ टक्क घेऊन द्वितीय तर रोहीत लखनलाल गिर्हेपुंजे ७५ टक्के घेऊन तृतीय आला. कला शाखेतून कु.लता प्यारचंद ऊईके ७४ टक्के घेऊन प्रथम, प्रणवी परमानंद चौरे ७२ टक्के घेऊन द्वितीय तर शुभांगी तेजराम बावनथडे ६८ टक्के घेऊन तृतीय आली. विज्ञान शाखेत तीन विद्यार्थी डिस्टि श्रेणीत तर २४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ऊतीर्ण झाले. कला शाखेत २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ऊतीर्ण झाले. सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सोमेश्वर पडोळे सचिव लिलाधर गिर्हेपुंजे, प्राचार्या प्रतिभा पडोळे, उपाध्यक्ष प्रा.जिभकाटे तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व कर्मचार्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.