बनावटी दारू अड्ड्यावर धाड कारवाई

0
310

गोंदिया,दि.18ः गुप्त माहितीच्या आधारावर रावणवाडी पोलिसांनी पाळत ठेवून दारू वाहून नेणार्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून माहितीच्या आधारावर आणखी दोघांना कारसह पकडण्यात आले. यापुढे मिळालेल्या माहितीनुसार मुर्री येथील बनावटी दारूच्या अड्ड्यावर धाड कारवाई करण्यात आली.
एकंदरीत या प्रकरणात ७६ हजारांचे दारूसह एकूण २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असून २ मुख्य आरोपी फरार आहे.बालाघाट वरून गोंदियाकडे दोघेजण अवैध दारू घेऊन येत आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर रावणवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सचिन बांगडे, उपपोनि. विनोद जोकार,
पोना. संजय चव्हाण, दीपक देशभ्रतार, राहुल बोंबार्डे, मोनेश तुरकर यांनी सापडा रचला. दरम्यान दोघांना दारु वाहून नेतांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३ पेटी देशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी मोमीन शेख, कदीर शेख दोन्ही रा. बालाघाट या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान त्यांनी आनंद नागपुरे व
सिद्धार्थ नंदागवळी रा. बाजपेयी चौक गोंदिया या दोघांची नावे सांगितली. या आधारावर दोघांना मारुती कारसह पकडण्यात आले. दरम्यान कारमधून तीन पेटी देशी दारू हस्तगत करण्यात आली. चौघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी मुर्री मार्गावरील बाजपेयी चौकाजवळ गोदाम असल्याचे सांगितले. यावरून बनावटी दारू अड्यावर धाड टावूâन १६ पेटी दारू जप्त करण्यात आली. एवंâदरीत या प्रकरण ७६ हजार रुपयांच्या दारूसह एवूâण २ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी मोमीन शेख, कदीर शेख, आनंद नागपुरे, सिद्धार्थ नंदागवळी या चौघांना
अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्य आरोपी शाम चाचेरे व मोनु ठाकुर हे दोघे फरार आहेत.