सालेकसा,दि.18ः- तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असलेल्या दरेकसा पोलीस आऊटपोस्टच्यावतीने बंजारी येथील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या आरोग्य शिबिरात 257 नागरिकांचे रक्तदाब,मधुमेह,ताप आणि इतर तपासणी करुन औषधांचे वितरण करण्यात आले.पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे यांच्या हस्ते यावेळी 300 नागरिकांना माॅस्क वितरित करण्यात आले.शिबिराला पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,उपविभागीय पोलीस अधिकारी जालंदीर नालकुल उपस्थित होते.आरोग्य शिबिरात ग्रामीण रुग्णालय सालेकसाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बघेले, प्राथमिक आरोग्य केंद्र दर्रेकसाचे डॉ. डोंगरवार, डॉ अंजली पांडे व त्यांची चमू उपस्थित होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी बंजारी ग्राम पंचायत सरपंच सौ. पगरवार, पोलीस पाटील मडावी, ग्रापं सदस्य किशोरीलाल उईके यांच्यासह पोलीस स्टेशन सालेकसाचे ठाणेदार डूनगे, सशस्त्र आउटपोस्ट प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सामलवार, परिवीक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन इंगोले, सतिश नवले व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
बंजारीतील आरोग्य शिबिरात 257 जणांची तपासणी
पोलीस विभागाने वाटले 300 माॅस्क