गोंदिया,दि.18ः- कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या आँफलाईन पध्दतीने करण्यासंबधी सर्व मुख्य कार्यकारी अधिका-यांना शासनाने दिलेल्या आदेशाचा विरोध करीत शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच करण्याची मागणी शिक्षक सहकार संघटनेने मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फेत निवेदन पाठवून केली आहे.निवेदन देतेवेळी विभागीय अध्यक्ष रवी अंबुले,जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम,कार्याध्यक्ष प्रमोद शहारे,उपाध्यक्ष नंदकिशोर उईके व कोषाध्यक्ष लाखेश्वर लंजे उपस्थित होते.सोबतच आनलाईन पध्दतीने बदलीचा चौथा टप्पा राबवितांना योग्य ती काळजी घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.जेणेकरुन कुठल्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही.आॅफलाईनमध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.