सडक अर्जुनी,दि.18 – नवेगाव-नागझिरा अभयारण्य परिसरातील तालुक्यातील डोंगरगाव डेपो परिसरात चितळाची शिकार झाल्याची गुप्त माहिती सडक-अर्जुनी वन विभागाला मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांनी आपल्या पथकासह चितळाची शिकार करून मांस शिजवत असलेल्या ठिकाणी धाड टाकून एका इसमास ताब्यात घेतले. मांस शिजवणाऱ्या वसंत सुका मेश्राम (५१) याला अटक केली असून भारतीय वन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे न्यायालयात हजर केले आहे. झालेल्या चितळ प्रकरणात इतर जर मुख्य आरोपी असतील तर ते लवकरच पकडले जातील अशी माहिती देखील वनविभागाने दिली.