अर्जुनी मोर,दि.07ः अज्ञात वाहनाने एका इसमास चिरडल्याची घटना राज्य महामार्ग क्रमांक २७५ वर तालुक्यातील खामखुरा गावाजवळ घडली. विनोद मधुकर मैंद (४०) असे मृत इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार राज्य महामार्ग क्रमांक २७५ वर खामखुरा गावाजवळ रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विनोद गंभीर जखमी अवस्थेत पडून होता. नागरिकांच्या मदतीने विनोदला अर्जुनी मोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान विनोदचा मृत्यू झाला. आज ७ जून रोजी उत्तरीय तपासणीनंतर विनोद चा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. दुपारी त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्यामागे पत्नी, एक
मुलगा, एक मुलगी, आईवडील व बराच आप्तपरिवार आहे.