-स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धडक कारवाई.
गोंदिया,दि.04-जिल्ह्या तील, वाढते चोरी, घरफोडी, वाढती गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता, गुन्हेगारांवर विशेषतः अवैध धंदे करणाऱ्यांवर वचक राहावा याकरिता गोंदिया शहरांतील सर्व प्रकारचे अवैध धंद्यांवर धाड कारवाई करून अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे, तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व आळा घालण्याचे त्याचप्रमाणे अवैधरित्या शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखू ची विक्री, व साठा करणाऱ्यावर धाड कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षकअशोक बनकर, यांनी दिले होते.
या अनुषंगाने दिनांक 03/06/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे पोलीस ठाणे गोंदिया शहर हद्दीत अवैध धंद्यावर धाड, गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पथकास विश्वस नीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, ईसंम नामे- सागर गोपलांनी याने आपले घरी अवैधरीत्या विक्री करिता शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू, गुटखाचा साठा करून ठेवला आहे.मिळालेल्या खात्रीलायक माहिती वरून दिनांक 03/06/2023 रोजी दुपारी पथकाने छापा घातला असता सागर बीसमलाल गोपलानी वय 23 वर्षे राहणार सिंधी कॉलनी, रावण मैदान जवळ गोंदिया हा मिळून आला. प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा विक्री,साठा प्रकरणी त्याचे राहते घराची घरझडती घेतली असता त्याचे घरी सुगंधित तंबाखूचा साठा ज्यात – पान मसाला , पान पराग, आर.एम.डी, जर्दा, रजनीगंधा, पान बहार, विमल गुटखा, राजश्री, धमाल, गोल्ड तंबाखू ,अश्या प्रकारच्या विविध सुगंधित तंबाखू चे 596 पॅकेट वजन 73 किलो 665 ग्राम किंमती 1, 42,405/- रुपयांचा प्रतिबंधित गुटखा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे.
सुगंधीत तंबाखूचा साठा करून बाळगल्या प्रकरणी– सागर बीसमलाल गोपलानी वय 23 वर्षे राहणार सिंधी कॉलनी, रावण मैदान जवळ गोंदिया याचेविरूध्द पुढील कारवाई करण्या करिता आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, विभाग भंडारा यांना पत्रव्यवहार करण्यात आले. जप्त मुद्देमाल सुगंधित तंबाखू साठा ताब्यात घेण्यात आलेल्या ईसंमासह अन्न व औषधी प्रशासन विभाग, भंडारा यांचे ताब्यात पुढील कार्यवाही करीता देण्यात आले. फिर्यादी महेश प्रभाकर चहादे, वय 43 वर्ष, अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन भंडारा यांचे फिर्याद वरून आरोपी विरूद्ध शासनाने प्रतिबंधि त केलेला सुगंधीत तंबाखू, गुटखाचा साठा केल्या व बाळगल्या प्रकरणी पोलीस ठाणें गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक 369/2023 कलम 188, 272, 273, 328 भादवि सहकलम 26(2) (आय), 26(2)(आय.व्हि) सहवाचन कलम 27(3) (आय), (ई) कलम 3 (1) (झेड झेड) (व्हि) 59 अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची धाड कारवाई मा. वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात व नेतृत्त्वात स.पो.नि. शिंदे, पो.उप.नि. विघ्ने, सहा.फौ.अर्जून कावळे, पो.हवा.राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, नेवालाल भेलावे, इंद्रजित बीसेन, विठ्ठल ठाकरे, सोमेंद्र तुरकर, सुजित हलमारे, मपोशी तोंडरे, येरणे, चापोशि गौतम यांनी कामगीरी केलेली आहे.