*१५ मोटारसायकल जप्त अजून सहा मिळणार
तिरोडा (दि.२5)- आज तिरोडा पोलिसांनी मोटार सायकल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५ वाहनें जप्त करण्यात आले.
मागील काही दिवसात तिरोडा शहर व परिसरात मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रमाण खूप वाढले होते. या अनुसंगाने तिरोडा पोलीस रात्रभर गस्त घालत.आज दि. २४ च्या पहाटे गस्त घालीत असताना पोलिसांना एक १६-१७ वर्षाचा बालक मोटार सायकल ढकलत नेत असल्याचा दिसला. त्याला हटकून चौकशी केली. त्याचे कडून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याच्या एका सोबत्याला ताब्यात घेण्यात आले व अजून एक जण बाहेरगावी गेला असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी दरम्यान आज १५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. अजून सहा मोटार सायकल बाबद माहिती मिळाली असून त्या उद्यापर्यंत मिळविण्यात येतील. तिरोडा पोलिसांनी विधी संघर्ष बालकांवर भा.दं.वि. ३७९,३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक देविदास कठाडे, पोलीस हवालदार नितेश बावणे, ज्ञानोबा श्रीरामे, सूर्यकांत खराबे, चेतन शेंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.