बोलेरोच्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा मृत्यू

0
42

(नितीन आगाशे)
तिरोडा (दि.२६) – तालुक्यातील धादरी उमरी गावाजवळ एका कृषी केंद्राच्या बोलेरो गाडीने मोटरसायकल स्वार विनोद कमलाकर कुकडे( ४८) रा. केसलवाड़ा यास धडक दिली असून ते गंभीर जखमी झाले. उपचाराकरीता भंडाऱ्याला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी १ वाजताचे सुमारास विनोद केसलवाड्यावरून तिरोड्याकडे मोटरसायकलने जात असताना बोलेरो गाडी क्र. MH36 AA 2057 ने त्यास धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून हात व पाय फ्रॅक्चर झाला आहे व डोक्याला सुद्धा गंभीर इजा पोचली आहे. तिरोडा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना भंडारा येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय भंडारा येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.