गोंदिया,दि.१२--इतर प्रांतातून मौल्यवान लाकाडांची तस्करी केली जाते. लाकूड तस्कारांवर गोंदिया वन विभागाने कारवईचा बडगा उगारला आहे. 10 डिसेबर रोजी येथील वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांच्या पथकाने मुंडीपार एमआयडीसी येथील रांदल वेअरहाऊस येथे कारवाई करून अवैधरित्या साठवून ठेवलेले 140 घनफूट सागवन जप्त करण्यात आले.या सागाची किमत 4 लाख रुपये असल्याचे सांगीतले जाते.
गोंदिया जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. येथील वनांत मौल्यावान वनसंपदा आहे. मौल्यवान लाकडांची तस्करी व वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार गत काळात समोर आले आहेत. येथील वनांत मौल्यवान लाकडे दतर प्रांतात या लाकडांना मोठी मागणी आहे. हिच बाब हेरून लाकूड तस्करी होत आहे. जवळील मध्य प्रदेश व छतीसगड राज्यातूनही जिल्ह्यात मौल्यवान लाकडांची तस्करी होत आहे. गोंदिया वनरिक्षेत्राचे वनक्षेत्राघिकारी दिलीप कौशिक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह मंगळवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारस मुंडीपार एमआयडीसीतील रांदल वेअर हाऊस येथे पाहणी केली असता तेथे अवैधरीत्या सागाची 140 घनमीटर लाकडे मिळून आली.
या लाकडांची किंमत 4 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान वेअरहाऊस मालक चिराग पटेल यांची चौकशी केली असता सागवान लाकडे उमिया सॉ मिलचे संचालक रमेश पटेल यांचे असल्याचे चिराग याने सांगीतले. रमेश पटेल यांनी जप्त करण्यात आलेली लाकडे आपलीच असल्याचे वन पथकाला सांगीतले. काही महिन्यांपूर्वी 9 लाखाची सागवान लाकडे वन विभागाने जप्त केली होती ती लाकडेही आपलीच असल्याची कबूली देखील रमेश पटेल यांनी दिली. लाकडांचा पंचनामा करून सर्व लाकडे पुढील कारवाईसाठी वन विभागाने ताब्यात घेतली आहेत.
इतर प्रांतातून मौल्यवान लाकडांची तस्करी करून नागपूर सारख्या मोठ्या शहरात विकली जातात. मंगळवारी जप्त करण्यात आलेली लाकडे मध्यप्रदेश किंवा गडचिरोली, कोरची वन क्षेत्रातील असावी, या प्रकारचे साग सहसा गोंदिया वन क्षेत्रात आढळत नाही. ज्या वाहनातून सागाची लाकडे वाहतूक करण्यात आली त्यांचा शोध घेणे सुरू आहे, पंचनामा करून सर्व लाकडे ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी कौशिक यांनी सांगीतले.