तर या धाडीत ३ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी अमित म्हापणकरला घेतले ताब्यात..
वेंगुर्ले:-म्हापण बाजार पेठ येथे आज पहाटे मध्यरात्री २ च्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी अमित म्हापणकर यांच्या राहत असलेल्या रूमवर धाड घातली असता,यामध्ये फेणी व विदेशी दारू तसेच बिअरसह तब्बल ६७ बाॅक्स सापडले आहेत.तर अमित वासुदेव म्हापणकर याला ताब्यात घेऊन अटक करून जामिनावर सोडण्यात आले असल्याची माहिती कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक मिलिंद गरूड यांनी दिली.
म्हापण मध्ये मोठ्या प्रमाणावर राजरोस दारूची विक्री होत असताना याची माहिती निवती पोलीसांना याची खबर कशी काय नाही?असा प्रश्न म्हापण मधील जनतेतून विचारला जात आहे.तसेच परूळा,निवती,आंदुर्ला,मुणगी,चेंदवण,कवठी,हुमरमळा आदी भागांत मोठ्या प्रमाणात राजरोस दारू विकली जात असल्याची जनतेमधून बोलले जात आहे.
म्हापण बाजार पेठेत एका भाजप पदाधिकाऱ्याच्या इमारतीत अमित म्हापणकर यांचा दारूचा जोरदार धंदा राजरोस पणे सुरू आहे.याची खबर कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर तातडीने निरीक्षक मिलिंद गरूड यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्कचे उदय थोरात, राहुल मोरे, अर्चना वंजारे आदि कर्मचाऱ्यांनी रात्री २ च्या सुमारास अचानक धाड टाकली.या धाडीत फेणी व विदेशी दारू तसेच बिअरसह तब्बल ६७ बाॅक्स सापडले.तर एकूण ३ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत अमित म्हापणकर याला ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले.तर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता,जामिनावर सोडल्याचे श्री गरूड म्हणाले.