नागराच्या कालभैरव मंदिरातील नगाडा चोरणारे गजाआड

0
420

गोंदिया,दि.२६ः गोंदिया पासून जवळच असलेल्या नागरा येथील प्रसिध्द कालभैरव मंदिरातील आरतीच्यावेळी वाजविले जाणारे नगाड़ा मशीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते.घटनेची तक्रार पोलिसात दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास यंत्रणा फिरवित चोरट्यांना जेरबंद केले आहे.