रेलटोली पालचौक येथे “हुक्का पार्लरवर” स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांची धाड

0
531

गोंदिया दि.३०:- गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारावर रेलटोली पालचौक येथे “हुक्का पार्लरवर” स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांची धाड घालून आरोपीला ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक  गोरख भामरे, यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  पालचौक, रेलटोली येथे *पार्लर मालक  विनोद ओंकार भंडारकर वय 35 वर्षे राहणार- बाजपेयी वॉर्ड गोंदिया* यांचे *”हुक्का कॅफे अँड टॉम्स कॅफे अँड हर्बल हुक्का”* या नावाखाली चालणाऱ्या हुक्का पार्लरवर दिनांक 29 मार्च 2025 रोजी रात्री 21.45 वाजता ते 22.45 वाजता दरम्यान छापा टाकून धाड कारवाई केली. चालविण्यात येत असलेल्या हुक्का पार्लर मध्ये तरुण युवकांना, ग्राहकांना नशेच्या आहारी करण्यात येत असल्याचे तसेच अनुज्ञप्ती परवानामध्ये नमुद नियमाचा उल्लंघन करून पार्लर मध्ये येणा-या ग्राहकांना, युवकांना हुक्का फलेवर न देता अवैधरित्या प्रतीबंधीत असलेला निकोटीन फलेवर पुरवित असल्याचे आढळून आल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली.पार्लर मालक आरोपी नामे  विनोद ओंकार भंडारकर यांचे ताब्यातून पार्लरमधून 03 नग काचेचे हुक्का पॉट पाईप सह  राख, 08 नग अल अयान कंपनीचे पान रजनी फलेवर पॉकीट असलेला बॉक्स ,08 नग रॉयल स्मोकिंग कंपनीचे किवी ब्लास्ट फलेवर पॉकीट असलेला बॉक्स, 05 नग रॉयल स्मोकिंग कंपनीचे मगाई पान रजनी फलेवर पॉकीट असलेला बॉक्स,10 नग रॉयल स्मोकिंग कंपनीचे व्हाईट रोझ फलेवर पॉकीट असलेला बॉक्स,50 नग वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे फल्वेर पॉकीट प्रत्येकी,05 नग कोकोनट चारकोल चे पॉकिट असा किंमती एकुण 11,710/- रुपयांचा प्रतिबंधित हुक्का फलेवर आणि हुक्का पॉट मिळुन आल्याने सविस्तर जप्तीची कारवाई करून पार्लर मालक आरोपी यांचे विरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे **अपराध क्र. 135/2025 कलम 4 (अ), 21 (अ) सिगारेट* आणि इतर तंबाखुजण्य उत्पादने (जाहीरात मनाई आणी व्यापार व वाणिज्य आणी वितरण नियमन कायदा 2003 महाराष्ट्र सुधारीत अधिनियम 2018 अन्वये* गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे…पुढील कायदेशीर कारवाई तपास प्रक्रिया रामनगर पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक. नित्यांनंद झा, यांचे निर्देशान्वये आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. धीरज राजूरकर, यांच्या नेतृत्त्वात पोउपनी- शरद सैदाणे, अंमलदार- मधुकर कृपाण, राजेन्द्र मिश्रा, महेश मेहर, भुवन देशमुख, तुलसी लुटे, प्रकाश गायधने, सुबोध बीसेन, सोमेंद्र तूरकर, दुर्गेश तिवारी, दुर्गेश पाटील, मुरली पांडे, राम खंदारे, स्मिता तोंडरे, कुमुद येरणे य़ांनी पार पाडली.