गोंदिया रेल्वेस्थानकावरुन ९ लाख ६० हजाराची रक्कम जप्त,रेसुबच्या चमूची कार्यवाही

0
1229

गोंदिया,दि.०३ःदक्षिण पूर्व मध्‍य रेलवे नागपूर मंडळाच्या रेल्वे सुरक्षा बलाने गोंदिया रेल्वेस्थानक परिसरातून ९ लाख ६० हजार रुपयाची रोख रक्कम घेऊन प्रवास करण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला प्लेटफार्म क्रमांक ३ वरुन ताब्यात घेतल्याची घटना 02 एप्रिल रोजी सायकांळी ५ वाजे दरम्यान घडली.

सविस्तर असे की मडंळ सुरक्षा आयुक्त दिपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनात रेलवे सुरक्षा बल /दक्षिण पूर्व मध्‍य रेलवे नागपुर च्यावतीने रेल्वेगाडीतून प्रतिबंधित सामान,मादक पदार्थ,रोख रक्कम व दागिण्याच्या होणार्या तस्करीविरुध्द सतत अभियान राबविण्यात येत आहे. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मंडळ टॉस्‍क टीम प्रभारी निरीक्षक कुलवंत सिंह यांच्या नेतृत्वात सह.उप नि.धर्मेंद कुमार, प्र.आ.जी.आर.मंडावी, प्र.आ.आर.रैकवार व गुन्हे शाखा गोंदियाच्या संयुक्त तपासणीवेळी स्टेशन प्रबंधक कार्यालयासमोरील प्लेटफार्म क्रमांक 03 वर एक व्यक्ती आपल्या हातात काळ्या निळ्या रंगाचा थैला घेऊन संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने विचारपूर केले असता राकेश गोकुलदास आहूजा 51वर्ष,मालवीय वार्ड रामचंद्र ऑयल मिल जवळ,श्रीनगर गोंदिया असे नाव सांगितले.तसेच थैलीमध्ये 8,10,000/- रूपये असल्याची माहिती दिली.सबंधित व्यक्तीला कार्यालयात आणून साक्षदारासमोर विचारपूस करुन अधिक तपास केले असता त्याच्या जवळून १ लाख ५० हजार रुपये थैलीतील रक्कम सोडून मिळाले असे एकूण ९ लाख ६० हजार रुपये त्याच्या जवळून जप्त करण्यात आले.संबधित रोख रकमेसंबधात कागदपत्राची मागणी करण्यात आली असता कुठल्याच प्रकारचे वैध कागदपत्र नसल्याचे सांगितल्याने सदर रक्कम तस्करी संदर्भात असल्याचे लक्षात आल्याने नागपूर आय़कर विभागाला माहिती देण्यात आली.त्या रकमेची तपासणी आय़कर विभाग करीत असून सदर पैशाची होणारी तस्करी थांबविण्याल्याने चमूचे कार्याची प्रंशसा केली जात आहे.