शिरपूर आरटीओ चेकपोस्ट येथे बर्निंग कार चा थरार!

0
98

देवरी,दि.१७:तालुक्यातील महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सिमेवर असलेल्या शिरपुर/बांध सीमा तपासणी नाक्यावर आज पहाटे ५:२५ वाजण्याच्या सुमारास द बर्निंग कारचा थरार गावकऱ्यांनी अनुभवला.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरुन नागपूरकडून झारखंडला जात असलेल्या चारचाकी वाहन असलेल्या कारला अचानक आग लागल्याची घटी घडली.लगेच अग्रिशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तोपर्यंत कार जळून खाक झालेली होती.यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क.५३ वरील देवरी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम शिरपूर असलेल्या सीमा तपासणी नाक्यावर पाच व्यक्ती आपल्या डस्टर गाडीने नागपूरकडून झारखंडला काही कामानिमित जात असताना, शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले मात्र आगीचा भडका मोठा असल्यामुळे कोणीही जवळ जाऊ शकले नाही. गावकऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अवघ्या काही मिनीटातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविले.