दिरंगी-फुलनारच्या चकमकीत सहभागी चार जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस व सिआरपीएफने केली अटक

0
29
गडचिरोली,दि.१९ः दिरंगी-फुलनारच्या चकमकीत सहभागी होत सी-60 जवानाच्या हत्येमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या चार जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफच्या जवांनानी आज(दि.१९)अटक केली आहे.त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकुण 40 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते.यात जहाल वरिष्ठ माओवादी दंापत्य रघु आणि जैनी (दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सचिव आणि भामरागड एरीया कमिटीची सचिव) व भामरागड दलमच्या दोन सदस्यांचा समावेश आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 96 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
सविस्तर असे की,आज दि. 19/04/2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे ताडगाव येथील पोलीस पथक व 09 बटा. सिआरपीएफच्या एफ कंपनीचे जवान संयुक्तपणे माओवादीविरोधी अभियान राबवित असताना पल्ली जंगल परिसरामध्ये त्यांना चार संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यंाची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता येथे आणले असता, सदर इसमांनी आपली नावे 1) सायलु भ्ुमय्या मुड्डेला ऊर्फ रघु ऊर्फ प्रताप ऊर्फ इरपा (डीव्हीसीएस, दक्षिण गडचिराली डिव्हीजन), वय 55 वर्षे, रा. लिंगापूर, तह. दरपेल्ली, जि. निजामाबाद (तेलंगाना) (जैनी खराटम हिचा पती), 2) जैनी भिमा खराटम ऊर्फ अखीला ऊर्फ रामे (डिव्हीसीएम, भामरागड दलम/सचिव भामरागड एरीया कमिटी), वय 41 वर्षे रा. कंचाला, तह. भोपालपट्टानम, जि. बीजापूर (छ.ग.) (सायलु मुड्डेला ऊर्फ रघु याची पत्नी), 3) झाशी दोघे तलांडी ऊर्फ गंगु (सदस्य, भामरागड दलम), वय 30 वर्षे, रा. येचली, तह. भामरागड जि. गडचिरोली, 4) मनिला पिडो गावडे ऊर्फ सरिता (सदस्य, भामरागड दलम), वय 21 वर्षे, रा. कापेवंचा तह. अहेरी, जि. गडचिरोली असे असल्याचे सांगितले. अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की, सदर चौघे इसम हे पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते पल्ली जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाले होते. तसेच पोलीस चौकशीत उघड झाले की, या चौघे माओवाद्यांंचा दि. 11 फेब्राुवारी 2025 रोजी मौजा दिरंगी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलीस जवानाच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. असे निष्पन्न झाल्याने त्यांना पोस्टे कोठी येथे त्या अनुषंगाने दाखल अप क्र. 01/2025 कलम 103, 109, 121 (1), 132, 189(2), 190, 191 (2), 61 भा.न्या.स., सहकलम 25, 27, 3, 5  भाहका, कलम 3, 4, 5, भास्फोका, सहकलम 13, 16, 18, 20, 23 बेकायदा कृत्य अधि. व सहकलम 135 महा. पो. अधि. या गुन्ह्रात आज रोजी अटक करण्यात आली आहे.
सायलु भुमय्या मुड्डेला ऊर्फ रघु ऊर्फ प्रताप ऊर्फ इरपा ऊर्फ सायलु आजपर्यंत एकुण 77 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 34 चकमक, 07 जाळपोळ, 23 खुन व 13 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
 जैनी भिमा खराटम ऊर्फ अकिला ऊर्फ रामेच्यावर आजपर्यंत एकुण 29 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 18 चकमक, 03 जाळपोळ, 04 खुन व 04 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
झाशी दोघे तलांडी ऊर्फ गंगुवर आजपर्यंत एकुण 14 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 12 चकमक, 01 खुन व 01 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
मनिला पिडो गावडे ऊर्फ सरितावर आजपर्यंत एकुण 10 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 04 चकमक, 05 खुन व 01 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
शासनाने सायलु भुमय्या मुड्डेला ऊर्फ रघु ऊर्फ प्रताप ऊर्फ इरपा याच्या अटकेवर 20 लाख रूपयांचे बक्षीस, जैनी भिमा खराटम ऊर्फ अकिला ऊर्फ रामे हिच्या अटकेवर 16 लाख रूपयांचे बक्षीस,झाशी दोघे तलांडी ऊर्फ गंगु हिच्या अटकेवर 02 लाख रूपयांचे  व मनिला पिडो गावडे ऊर्फ सरिता हिच्या अटकेवर 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, कमांडंट 09 बटा. सिआरपीएफ, शंभू कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागडअमर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे ताडगाव व सिआरपीएफच्या अधिकारी व जवान यांनी पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.