अमरावती,दि.२१ः जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातंर्गत येत असलेल्या कै.किसनराव उभाड विद्यालय बदनापूरच्या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या वेतनाच्या फरकाचे एरीयस बिल काढून देम्याकरीता १० टक्के कमिशनची लाच मागणार्या लिपिकाला अमरावती येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ६ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले.
पिडित तक्रारदार यांनी लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने दि.१६/०४/२०२५ रोजी लाचलुचपत विभागाकडे तकार दिली. तकारदार या सेवानिवृत्त शिक्षीका आहेत आणि त्या कै.किसनराव उभाड विद्यालय, बदनापूर ता.चिखलदरा,अमरावती येथे सहायक शिक्षीका यापदावर सन २००३ ते २०२२ पर्यंत कार्यरत होत्या. त्यांचे सहायक शिक्षीका या पदाच्या वेतनाच्या फरकाचे वाढीव एरियर्स बिल ६९,०२४ रुपयाचे देयक प्रलंबित होते. त्यांचे हे बिल काढून दिल्याचा मोबदला तसेच इतर प्रलंबित बिले काढुन देण्यासाठी कै. किसनराव उभाड विद्यालय, बदनापूर ता. चिखलदरा जि.अमरावती येथील लिपीक उमेश कडू यांनी तकारदार एकूण बिलाच्या १० टक्के रक्कम म्हणजे ६९०० रूपये लाचेची मागणी केली,मात्र लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदारा शिक्षिकेने सविस्तर लेखी तकार दिल्याने तकारीवरून दि.२१/०४/२०२५ रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान उमेश मनोहराव कडु यांने एरियर्स बिल काढून दिल्याचा मोबदला तसेच इतर प्रलंबित बिल काढून देण्यासाठी तडजोडी अंती ६००० रूपए लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सोमवार दि.२१/०४/२०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष उमेश मनोहराव कडु,याने तकारदार यांचेकडुन ६००० रुपये लाच रक्कम गांधीगेट ते झुला चौक रोड,बेगमपुरा, अचलपुर परिसरात स्वताः स्विकारल्याने त्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून आरोपी उमेश कडूविरुध्द पो.स्टे.अचलपुर, जिल्हा अमरावती येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.
सदरहू सापळा कारवाई सापळा अधिकारी, पो.उपअधीक्षक मंगेश मोहोड, पोनि.केतन मांजरे,पोलीस अंमलदार युवराज राठोड, राजेश मेटकर, आशिष जांभोळे, विनोद धुळे, स्वाती सरोदे, चालक पोउपनि. सतिश किटुकले, राजेश बहिरट यांनी पार पाडली.