मानोरा फाटा जवळ ट्रॅव्हल्सला अपघात 23 प्रवासी जखमी; तीन गंभीर

0
57

भिवापूर :- चामोर्शी वरून सकाळी नागपूरला जात असलेल्या एका ट्रॅव्हल्स चा भिवापूर तालुक्यातील मानोरा फाट्याजवळ अपघात झाल्याने ट्रॅव्हल्स मधील 23 प्रवासी जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त असे की, सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे चामोर्शीवरून बाबा ट्रॅव्हल्स एम एच 37 बी 69 67 क्रमांकाची ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने नागपूरला (Nagpur)जात होती. मानोरा फाटा जवळ आल्यानंतर चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने बस (Bus) पलटी झाली व नजीकच्या नाल्यात कोसळली. यात 23 प्रवासी गंभीर जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच भिवापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. नागरिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना भिवापूर व उमरेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ पारवे व माजी आमदार सुधीर पारवे यांनी भेट देऊन जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.