मंगरूळपीर (Washim) :- मंगरूळपीर तालुक्यातील मौजे सायखेडा येथील अल्पभूधारक शेतकरी पुंडलिक भगत यांच्या एकुलता एक पुत्रांनी कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. या आत्महत्येमुळे गावात शोकाकळा पसरली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुखदेव झाडूजी भगत वय 65 वर्षे राहणार सायखेडा यांनी फिर्याद दाखल केली की, माझा पुतण्याअल्पभूधारक शेतकरी पुत्र बाळकृष्ण पुंडलिक भगत वय 35 वर्ष यांनी दिनांक 23 एप्रिल रोजी 5 वाजता स्वतःच्या शेतात जाऊन शेताच्या पूर्व धुर्यावरील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार अरविंद सोनुने करीत आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृतक बाळकृष्ण भगत यांच्या वडिलांच्या नावे साडेतीन एकर शेती असल्याने यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँक शाखा मंगरूळपीर चे 70 हजार रुपये कर्ज होते. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना कर्जमाफी न झाल्याने सतत विवंचनेत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला आहे त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील पत्नी व लहान मुलगी असून त्यांच्या आत्महत्या ने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.