पेट्रोल पंपावरील रोख रक्कम चोरणारा चोरटा गजाआड

0
55

अर्जुनी-मोर.,दि.२५ः-अर्जुनी मोर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरोली/महागाव येथील पेट्रोलपंपावरील रोख चोरी करणार्या चोरट्यास काही तासातच २०१००/- रु.च्या रोख रकमेसह गजाआड करण्यात अर्जुनी-मोर. पोलिसांना यश आले आहे.

     याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि. २२/०४/२०२५ रोजी पहाटे ०४/०० वाजे सुमारास मौजा सिरोली येथील इसम संदीप राऊत याने मौजा सिरोली येथील राधिका कृषी सेवा केंद्र सिरोली पेट्रोल पंप वरील मजुरांची नजर चुकवुन स्टोअर रुममध्ये प्रवेश करुन तिथे ठेवलेल्या बॅगमधुन 22400/- रुपये चोरुन पसार झाला असे पेट्रोलपंपचा मॅनेजर रोशन शेंद्रे रा. सिरोली यांचे तक्रारीवरुन पोस्टेला अप क. १६१/२०२५ कलम ३०३(२), ३०५ (अ) वीएनएस २०२३ अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला व अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घनशाम रोहनकर, सुशील नलावडे व पोहवा सेलोकर, पोहवा बेहेरे, पोहवा आरसोडे, पोशी लाजेवार, पोशी पर्वते, पोशी नाकाडे यांनी माननीय पोलीस अधीक्षक  गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी  विवेक पाटील व ठाणेदार कमलेश सोनटक्के यांचे मार्गदर्शनाखाली तपासाची चके वेगाने फिरवुन अथक परिश्रम घेवून आरोपीला काही तासातच जेर बंद केले. व चोरीला गेलेली रक्कम हस्तगत केली.