शिकारी व ट्रॅक्टर वनविभागापासून लांबच

0
46

साकोली,दि.27 : वनविभाग साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगलात दोन दिवसापूर्वी एक मादी रानगवा मृतावस्थेत आढळून आला. या रानगव्यांच्या शिकारीप्रकरणातील शिकारी व वापरण्यात आलेला ट्रॅक्टर अजूनपर्यंत वनविभागाला सापडलेला नाही. साकोली परिसरात शिकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
२५ मे रोजी दुपारी वलमाझरीच्या जंगलात एका रानगव्याची विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने शिकार करून मृत रानगवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणून फेकल्याची घटना उघडकीस आली. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचा ताफा घटनास्थळावर पोहचला. त्या रानगव्याला तिथेच खड्डा खोदून पुरण्यात आले.
या घटनेला तब्बल दोन दिवसाचा कालावधी लोटला असला तरी रानगव्याची शिकार करणारे व शिकारीनंतर या रानगव्याला ज्या ट्रॅक्टरने सोडण्यात आले त्या ट्रॅक्टरचा शोध घेण्यास वनविभागाला अपयश आले आहे.