रेंगेपार येथे कर्जपोटी विषप्राशन केलेल्या शेतकर्याचा मृत्यु

0
15

भंडारा,दि.27ःःराज्यातील भाजप सरकारएकीकडे कर्जमुक्तीचे गोडवे गात असून आमच्या पक्षामुळेच शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळाल्याचे पत्र पोस्टाने पाठवित असतानाच तुमसर तालुक्यातील पांजरा/ रेंगेपार येथील शेतकरी गजानन विठोबा उकुंडे (वय ५०)यांनी कर्जाच्या रक्कमेची परतफेड करु शकत नसल्याच्या कारणाने आपल्या शेतात किटकनाशक औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.उकुंडे यांचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२५ मे रोजी शेतावर लावलेल्या धान पिकाला पंपाने पाणी देण्यासाठी घरून निघाला होता.त्यातच विद्युत पंपाना रात्री विद्युत पुरवठा मिळत असल्याने तो शेतावर गेला होता.पिकाला पंपाने पुरेसा पाणी मिळत नाही, त्यामुळे शेतातील धान पिक नष्ट होऊ लागल्याने चिंतातूर त्यातच कर्जमाफीच्या नावावर सरकारने केलेली फसवणूक,थकित कर्जामुळे गोठवले बैंक खाते,सतत होणारी नापीकी या सर्व त्रासाला कंटाळून सदर शेतकर्याने आत्महत्या केल्याने त्यांना शासकीय मदत देण्याची मागणी पुढे आली आहे.
उकुंडे यांच्यावर तुमसर शाखा I C I C I बैंकेचे ३ लक्ष ५० हजाराचे आणि सिहोरा BDCC बँंक शाखेचे थकित कर्ज असून विज पंपाच्या बिलाची रक्कमही थकीत होती. त्यातच शेतातून काही मिळत नसल्याने मुलगा पत्नीला माहेरी सोडून रोजगारासाठी बाहेरगावी गेल्याने ते नेहमीच तणावात राहायचे.