नापिकीला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

0
14

गोरेगाव,दि.05ः-सततची नापिकी व कर्जफेडीच्या विवंचनेत तरुण शेतकड्ढयाने स्वत:च्याच शेतात झाडाला नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार, ४ जून रोजी तालुक्यातील गौरीटोला येथे घडली. सतीश सुरजलाल चौरागडे वय ३0 असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
सतीश चौरागडे हा अल्पभूधारक असून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. दोन वषार्पूर्वी त्याच्या भावाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषनची संपूर्ण जबाबदारी सतीशवर होती. दरम्यान, त्याने कर्ज काढून शेतीचा खर्च व पाण्यासाठी बोरवेलची सोय केली होती. मार्च महिन्यात त्याचे लग्न झाले होते. परंतु, रोग व कीडीच्या प्रादुभार्वामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच कर्जफेड करू शकत नसल्याने नवीन कर्ज मिळणे दुरावस्थ झाले होते. त्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, हा आपल्यासमोर मोठा प्रश्न असल्याचे सतीश आपल्या मित्रांना नेहमी सांगायचा. त्यामुळे या विवंचनेतूनच त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी र्मग दाखल केला आहे.