‘त्या’ बेपत्ता विद्यार्थ्याची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचा संशय

0
50

‘त्या’ बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचा संशय
गोंदिया ,दि.१६:-तालुक्यातील कामठा -चिरामनटोला येथील विद्यार्थी १५ डिसेंबरपासून बेपत्ता झाला होता. तसी तक्रारही पोलिसात करण्यात आली होती. मात्र त्या विद्यार्थ्याचा आज (दि.१७) आमगाव तालुक्यातील मुंडीपार येथील नदीत दगडाने बांधलेला मृतदेह मिळून आला. त्या विद्यार्थ्याची हत्या करूनच मृतदेह नदीत फेकून देण्यात आल्याची चर्चा आहे. सौरभ मोरेश्वर कटारे (२०) रा. चिरामनटोला असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
सविस्तर असे की, सौरभ कटारे हा येथील अभियांत्रिक महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान १५ डिसेंबर रोजी तो अचानक बेपत्ता झाला. त्याचा शोध न लागल्याने कुटुंबांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारावर सौरभचा शोध घेण्यात आला. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. शेवटी आज (ता.१७) आमगाव तालुक्यातील मुंडीपार नर्सरी जवळील नदीत दगडाने बांधलेला मृतदेह तरंगतांना दिसून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेहाची तपासणी केली असता हा मृतदेह सौरभ कटारे असल्याचे स्पष्ट झाले.सौरभची त्या की आत्महत्या हा चौकशीचा विषय असला तरी सौरभची पैस्यासाठी हत्या करण्यात आली असावी, अशी चर्चा घटनास्थळावर सुरू होती. यामुळे या प्रकरणाचा छळा लावणे पोलिसांसमोर एक आवाहन झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.