चंद्रपूर शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासात साडेतीन लाख लंपास करणार्या आरोपीलास केली अटक

0
15
चंद्रपूर,दि.13ः- शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून 10 जानेवारी च्या रात्री, शंभवेल वामणराव रामटेके (खिश्चन कॉलनी )हे घटनेच्या दिवशी काही कामानिमित्य घराला कुलुप लावून बाहेर गेले असता  अज्ञात चोराने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 362500/- रू चा माल लंपास केला होता.रामटेके यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी घटनास्थळावर जाऊन चौकशी केली.तसेच आधीच्या अशा प्रकरणातील आरोपी व इतरांचा शोध घेत असता संशयीत आरोपीला पोलीस स्टेशनला आणुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज व रोख रक्कम हस्तगत करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 12 तासाचे आत गुन्हा उघडकिस आणला. सदर कार्यवाही  पोलीस निरीक्षक श्री बाहादुरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक व्हि. एस रहांगडाले पोउपनि कोडापे पोहवा. महेंद्र बेसरकर, स्वामीदास चालेकर विलास निकोडे किशोर तुमराम, बंदिराम पाल, बाबा डोमकावळे, शरीफ शेख, सिध्दार्थ रंगारी नापो. रामकिसन सानप, पांडुरंग वाघमोडे, सत्यवान कोटनाके, पोशि. सचिन बुटले, जितेंद्र चुनारकर, पंकज शिंदे, मंगेश गायकवाड यांनी केली.