अर्जुनी मोरगाव,दि.18ः-तालुक्यातील चिचोली/जुनी येथील तरुण रत्नदीप चंद्रशेखर बोरकर (२० वर्ष) चा इटीयाडोह धरणाच्या कालव्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुदैवी घटना आज(दि.18) घडली.शेतावर रोवणीच्या कामाला सुरुवात केली होती.शेतात पाणी नसल्याने वडील घरी आले. वडीलांनी मुलाला पाणी बरोबर येत नाही म्हणून कालव्यावर जायला सांगितले.रत्नदीप सकाळीच तिबेट वसाहतीलगतच्या कालव्यावर पोहचला.पंपाजवळ गवत आणि कचरा जमा दिसून आल्याने सफाई करण्याच्या उद्देशाने तो कालव्यात उतरत असताना रत्नदिपचा तोल गेला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची नोंद केशोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली.रत्नदीपचे मृतदेह अजूनही मिळाले नाही.