गोरेगाव तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनाचे यशस्वी आयोजन

0
37

शिक्षक माध्यमिक शिक्षक गटात-प्रथम-ए.एच.कटरे,प्राथमिक शिक्षक गटात प्रथम-सौ.बी.के.कटरे

विद्यार्थी प्राथमिक गटात प्रथम-कृष्णा रामेश्वर मेळे,माध्यमिक गटात प्रथम-गौरव चंद्रप्रकाश घोडेस्वार

गोरेगाव,दि.26ः- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने गोरेगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे दोन दिवसीय आयोजन लोकमान्य टिळक विद्यालय,मुंडीपार येथे करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिकृतींचे प्रदर्शन आणि शिक्षकांनी तयार केलेल्या प्रात्यक्षिकांचे मुल्याकंन करुन दि.25  रोजी स्पर्धेतील विजेत्या शिक्षक व विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रामुख्याने बक्षीस वितरण कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे,उपसभापती राजकुमार यादव ,प्रभारी गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे,गटसमन्वयक एस.बी.खोब्रागडे,एस.एस.बिसेन(मुख्याध्यापक,लो.टी. विद्या.मुंडीपार) केंद्रप्रमुख एच.एस.शहारे,एन.सी.बिजेवार, सौ वैष्णव,कु.रेणुका जोशी तसेच गट साधन केंद्र गोरेगावचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.,
प्राथमिक विभागात वर्ग 6 ते 8 च्या विद्यार्थ्यांचे एकूण 39 मॉडेल,माध्यमिक विभागात वर्ग 9 ते 12 चे एकूण 19 मॉडेल,प्राथमिक शिक्षक गटात 2 मॉडेल,माध्यमिक शिक्षक गटात 2 मॉडेल तसेच प्रयोगशाळा सहाय्यक गटात 1 मॉडेल असे एकूण 63 मॉडेल सहभागी करण्यात आले होते.सदर प्रतिकृतींचे मूल्यमापन जगत महाविद्यालय,गोरेगावचे व्याख्याता प्रा.डॉ.बी.जि.सूर्यवंशी, प्रा.डाॅ.एस. एस. रहांगडाले तसेच डॉ. व्ही.यु.रहांगडाले यांनी केले.
सदर प्रदर्शनी मध्ये प्राथमिक गटात प्रथम-कृष्णा रामेश्वर मेळे,वर्ग 7 वा जि प व प्राथमिक शाळा बोळुंदा,
द्वितीय-कु.पायल राकेश लोणबले, वर्ग 7 वा ,जि प व प्राथमिक शाळा मुरदोली, तृतीय-कु.अश्मिरा शहनावाजखान पठाण,वर्ग 8 वा किरसान मिशन स्कूल गोरेगाव
माध्यमिक गटात प्रथम-गौरव चंद्रप्रकाश घोडेस्वार,वर्ग 12 वा ,एम आय पटेल हायस्कुल सोनी,द्वितीय-कु.मयुरी सुरेश ठाकूर,वर्ग 12 वा जि प हायस्कुल गोरेगाव,तृतीय-जय नीलचंद पटले,वर्ग 10 वा परशुराम विद्यालय,मोहंगाव बु.
प्राथमिक शिक्षक गटात प्रथम-सौ.बी.के.कटरे(स.शि.) परशुराम विद्यालय,मोहंगाव बु.,द्वितीय-यु.एस.रहांगडाले(प.शि)जि प व प्राथमिक शाळा हिरापूर
माध्यमिक शिक्षक गटात-प्रथम-ए.एच.कटरे(स शि),पी.डी.रहांगडाले विद्यालय गोरेगाव,द्वितीय-एस.एम.रामटेके(स.शि.)संजय गांधी विद्यालय तेढा,प्रयोगशाळा सहाय्यक गटात –प्रथम पी.एम.दमाहे सरस्वती माध्यमिक शाळा घोटी यांनी पारितोषिक पटकावले.सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र,शब्दकोश व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण प्रसंगी सभापती मनोज बोपचे यांनी विद्यार्थी व शिक्षकांची स्तुती करीत विद्यार्थ्यांच्या कला,गुणांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.गटशिक्षणाधिकारी सिरसाटे यांनी सत्र 2022-23 च्या नियोजित विज्ञान प्रदर्शनी मध्ये तसेच प्रत्येक उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी सर्व शिक्षकांना प्रोत्साहित केले.कार्यक्रमाचे संचालन एच.सी.ठाकूर(स.शी)मुंडीपार तसेच सुनील ठाकूर(विषय साधन व्यक्ती,गसाके गोरेगाव)यांनी तर प्रास्ताविक भास्कर बाहेकर(वी.सा.व्यक्ती विज्ञान) यांनी केले.सर्व उपस्थितांचे आभार गटसमन्वयक एस.बी.खोब्रागडे यांनी मानले.
या दोन दिवसीय आयोजनात प्रामुख्याने लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपारचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच गट साधन केंद्र गोरेगावचे सर्व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.