गोंदिया,दि.१३ः- : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहिर झाला आहे. या निकालात एमपीएससीच्या ग्रुप सी मधून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील समर उमाशंकर पारधी याने ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम तर सर्वसाधारण प्रवर्गातून व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. समर पारधीच्या यशामुळे जिल्हाभरात त्याचे कौतुक केले जात आहे. तिरोडा येथील समर उमाशंकर पारधी याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षा दिली.त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.