अर्जुनी-मोर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले.माॅ.जिजाऊच्या संस्कारात वाढलेले शिवाजी महाराज हे एक बलाढ्य व आदर्श राजे ठरले,त्यांचे कार्यकाळात जनता व शेतकरी आनंदाने जगत होते.आज छत्रपती शिवाजी महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या जयंत्या संपुर्ण भारतासह जगात साज-या केल्या जातात. या दोन्ही महापुरुषांच्या कार्याला जगात तोड नाही.आपल्याला या महापुरुषांच्या विचाराने चालायचे असल्यास त्यांचे इतिहास वाचल्याशिवाय महापुरुषांचे कार्याची व विचारांची महती कळणार नाही.असे आवाहण बोंडगांवदेवी क्षेत्राचे जि.प.सदस्य तथा नवनिर्वाचित गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.
अर्जुनी-मोर. तालुक्यातील चान्ना व ईतर गावांत आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात विशेष अतिथी व सत्कार मुर्ती म्हणुन लायकराम भेंडारकर बोलत होते.अर्जुनी-मोर. तालुक्यात विविध धाबेटेकडी / आदर्श, चान्ना,बाकटी,खांबी,नवेगावबांध, कोकणा/ जमीदारी,अशा विवीध गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती धुमधडाक्यात स्पर्धात्मक कार्यक्रम, खंजेरी स्पर्धा अशा विवीध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.अर्जुनी-मोर. तालुक्यातील बहुतांशी गावात गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी हजेरी लावली,भेंडारकर यांची नुकतीच गोंदिया जिल्हा परिषद च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने या जयंती सोहळ्याचे निमित्ताने भेंडारकर यांचे प्रत्येक गावात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.लायकराम भेंडारकर यांचेवर बालपणापासूनच संतसहवासाचे संस्कार लाभले असुन महापुरुषांच्यांही विचाराचा पगडा पडला असल्याने महापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसार व्हावा,व राजकारणाच्या माध्यमातुन जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याने भेंडारकर यांनी अर्जुनी-मोर. तालुक्यातील सर्व जनतेचे मनापासुन आभार मानले.