गोरेगाव,दि.२७- तालुक्यातील किरसान इंटरनेशनल स्कूल गणखैरा येथे 24 फेब्रुवारी ते 1मार्च 2025पर्यंत शिक्षक क्षमता वृद्धि प्रशिक्षणाच्या तिसर्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे.या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या नविन शैक्षणिक धोरणासंदर्भात पार्श्वभूमीवर, गरज व याचे फायदे याविषयावर सखोल अभ्यास करण्यात आले.नविन युगामधिल नवनवीन समस्येवर मात करण्याकरिता आपले विद्यार्थि कसे तयार करण्यात यावेत ,त्यांच्यामधे चौकस विचारसरणि जागृत करणे , त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात विविध विषयांवर नवनिर्मिती कसी करावी अशा विविध प्रकारच्या नविन संकल्पनांवर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.क्षमता आधारित अध्ययन -अध्यापन, क्षमता आधारित मुल्यांकन व नविन कार्यनिति यावर विविध ऊदाहरणे, विविध प्रायोगिक तत्त्वावर मार्गदर्शन करण्यात येत आहे.या टप्प्यात एकूण 210 शिक्षकांचे सकाळी 10ते 6 वाजेपर्यंत प्रशिक्षण होत आहे.या प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ.घनश्याम बघेले,भाष्कर बहेकार ,उत्तम टेंभरे,आर.आय. रहांगडाले,एस.एम.बोपचे ,एच.जे.रहांगडाले,एम.डि.पटले,मोहन बिसेन, दिनेशऊके,एस.आर.जगणे,ए.जी.राठोड, उमेश रहांगडाले,सुनिता मांढरे यांनि प्रशिक्षण दिले.