मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगाव च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..

0
148

गोरेगांव:- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव च्या विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत राज्य स्तरावर यश संपादन करत राज्य पातळीवर शाळेचे नाव गौरवांवीत केले आहे. श्रेया धनलाल पटले वर्ग 5 वी व रुद्र भागवत बिसेन वर्ग 3 री यांनी राज्य पातळीवर 3 रा व 7 वा क्रमांक प्राप्त करून स्कॉलरशिप प्राप्त केली आहे. त्याचबरोबर पारस पवनकुमार रहांगडाले, सागर संतोष ठाकूर, आर्यन मधुकर पवार, दक्ष प्रशांत बारेवार यांनी मेडल प्राप्त केले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करून कौतुक केले . संस्था सचिव आर.डी.कटरे, सी.बी.पटले, मुख्याध्यापक सी.पी.मेश्राम, पर्यवेक्षक एस.डी. चिचामे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्था सचिव, प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व आई वडील यांना दिले.