गोंदिया,दि.०२ः राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी आयोजित दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे जिल्हास्तरीय बक्षीस वितरण समारोहाचे आयोजन आज दिनांक २९ मार्च रोजी गुरुनानक शाळेचे सभागृह गुरुनानक स्कूल गोंदिया येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोंदिया शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित जी.ई.एस.हायस्कुल पांढराबोडी व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पांढराबोडी येथे कार्यरत सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत तंत्रस्नेही शिक्षक विनोदकुमार माने यांना शिक्षकांसाठी आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे भाषा विषय सामाजिक शास्त्र इयत्ता नववी दहावीच्या गटातील जिल्हास्तरीय दुसरा, तिसरा पुरस्कार तर तालुकास्तरीय पहिला, दुसरा असे एकूण चार पुरस्कार पटकावले याबद्दल शिक्षण विभागाद्वारे त्यांचा 22000 रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ नरेश वैद्य, गोंदिया जि.प.माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.महेन्द्र गजभिये, जि.प.प्राथ.शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, डायटचे अधिव्याख्याता पुनम घुले, भाऊराव राठोड, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विनोदकुमार माने विद्यालयात विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन कार्याव्यतिरिक्त अभ्यासक्रमावर आधारित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार करतात असतात. त्याचबरोबर विद्यालयामध्ये नानाविध उपक्रम राबवून, विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण व्हावे यासाठी आर.एस.पी चे वर्ग घेतात, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप, नवोदय परीक्षा, एन.एम.एम.एस. व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या यूट्यूब चैनल वर ऑनलाईन मोफत मार्गदर्शन करतात. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार प्रफुल भाई पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षाताई पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन साहेब, संचालक निखिल राजेंद्र जैन साहेब.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंदनभाऊ गजभिये, विद्यालयाचे प्राचार्य अजय रहांगडाले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रिताराम लिल्हारे, प्रभुलाल शेंडे, जि.प.सदस्या शांताबाई देशभ्रतार, सरपंच पांढराबोडी झुमकलाल दमाहे, उपसरपंच विनोद चव्हाण, पंचायत समिती सदस्य भुवनसिंह नागपूरे, माजी उपसरपंच धुरणभाऊ सुलाखे यांनी अभिनंदन व्यक्त करीत भविष्यातील पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे मा.अध्यक्षा, मा.सचिव, मा.संचालक यांच्यासह पत्नी सौ सुषमा माने, मुलगा आयुष माने, खिलेश माने, खुशाली माने,आई वडिलांसह विद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना दिले आहे.