मॉडेल कॉन्व्हेन्टच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत सुयश…

0
26

गोरेगांव :- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेन्ट गोरेगांव शाळेतील विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश प्राप्त करून शाळेचे नाव गौरवांवीत केले आहे. स्पर्धेत उत्तम चित्रकला प्रदर्शित केलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, मेडल व प्रशस्तिपत्र देण्यात आले. यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना संस्था सचिव आर. डी. कटरे, शाळेतील प्रशासकीय अधिकारी सी.बी. पटले, मुख्याध्यापक सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक एस. डी. चिचामे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.