शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा तालुकास्तरीय बक्षीस वितरण समारंभ !
गोरेगाव,दि.०९:- राज्य शैक्षणिक संधोधन व प्रशिक्षण संस्था,महाराष्ट्र पुणे द्वारा आयोजित शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये परशुराम विद्यालय मोहगावं बु.च्या सहाय्यक शिक्षिका सौ.भारती खेमेंद्र कटरे यांनी गणित विषयात द्वितीय क्रमांक पटकावला.या तालुकास्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पंचायत समिती गोरेगाव च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी पंचायत समिती सभापती चित्रकला चौधरी,उपसभापती रामेश्वर महारवाडे,गटविकास अधिकारी एच. व्ही.गौतम,गटशिक्षण अधिकारी एम.डी.पारधी,अधिव्याख्याता पूनम घुले,गट समन्वयक एच.एम.बोपचे,शिक्षण विस्तार अधिकारी डी.टी.कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.
एकूण चार गटातील भाषा,गणित,इंग्रजी,सामाजिक शास्त्र,विज्ञान या प्रत्येक विषयात प्रथम,द्वितीय व तृतीय असेेे ४८ शिक्षकांना बक्षीस देण्यात आले.सर्व शिक्षकांना प्रशस्तीपत्र,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक 3000रु द्वितीय पारितोषिक 2000रु.तर तृतीय पारितोषिक 1500रु.देण्याचे नियोजित आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गट साधन केंद्र गोरेगाव चे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.संचालन सुनील ठाकूर विषय साधन व्यक्ती, गसाके गोरेगाव तर आभार मा.डी टी कावळे,विस्तार अधिकारी प.स.गोरेगाव यांनी मानले.