श्री पब्लिक शाळेत वसुंधरा दिन साजरा

0
13

चित्रा कापसे
तिरोडा-  स्थानिक श्री पब्लिक शाळेत आज दि.२२ ला वसुंधरा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी परिपाठानंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित असलेले श्री पब्लिक शाळेचे संचालक रामकृष्ण शेंडे तसेच मुख्याध्यापक राधाकृष्ण शेंडे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले, विद्यार्थ्यांनी घरुनच वसुंधरा या थीम वर आधारित पोस्टर्स आणि विविध चित्रे काढून आणलेले होते. काही विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे विश्व पृथ्वी (वसुंधरा दिन)दिवस साजरा करण्या मागचा उद्देश सांगितला. काही विद्यार्थ्यांनी घोषवाक्य सांगितले. त्यानंतर शाळेतील शिक्षीका संगीता ठवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . दिनेश सिंग यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रदूषणाबद्दल आणि पर्यावरणाबद्दल योग्य असे मार्गदर्शन केले. संचालक रामकृष्ण शेंडे यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक संवर्धन कशाप्रकारे टिकवता येईल,प्रत्येकाने एक एक झाड लावावे आणि पर्यावरणाचे संरक्षण करावे असे विद्यार्थ्यांना सांगितले त्यानंतर मुख्याध्यापक राधाकृष्ण शेंडे यांनी प्लास्टिकचा उपयोग टाळावा पाण्याचा सदुपयोग करावा तसेच पर्यावरणाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली . पर्यावरण संरक्षणाची शपथ विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वैष्णवी शरणागत यांनी केले.