भंडारा,दि. 25 :– सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरीता शासनाची योजना असून त्याकरीता अनुसूचित जमातीचे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे कार्यालयाकडून 31 मार्च 2020 पर्यंत अर्ज स्विकारले जातील. अर्ज निशुल्क वितरीत करण्यात येणार असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली ते दुसरी पर्यंत शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.
पात्रता व अटी या प्रमाणे आहेत. विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. सक्षम अधिकारी यांचेकडून प्राप्त दाखला जोडावा. सन 2020-21 या वर्षात पालाचे सरासरी उत्पन्न 1 लाख रुपयांचे आत असावे. इयत्ता पहिली करीता विद्यार्थ्यांचा जन्म दाखला व इयत्ता 2 री करीता शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत जोडावे लागेल. प्रवेश घेण्यापूर्वी पालकांना या कार्यालयात प्रवेशाबाबतचे संमती लिहून द्यावे लागेल. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, पालकांचा रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखाली असल्यास तसा दाखला, पालक विधवा असल्यास तसा दाखला सोबत जोडावा.
प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प भंडारा, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती भंडारा, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखांदुर, लाखनी, साकोली या ठिकाणी तसेच मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा खापा, अनुदानित आश्रमशाळा माडगी, आमगाव (आदर्श ), कोका (जं), जांभळी/ खाबा, येरली, चांदपूर, पवनारखारी येथे निशुल्क उपलब्ध आहेत.अधिक माहितीकरीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.