खेमू फुंडे तालुक्यातून प्रथम

0
90

अर्जुनी मोरगाव,दि.27ः-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय गोंदिया मार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञाशोध परीक्षेत जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा येगाव येथील वर्ग सातवीची विद्यार्थिनी खेमू मोरेश्वर फुंडे हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तालुक्यातून 45 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. सदर परीक्षेत केंद्रातून 3 मुलांना प्रवेश मिळाला होता. या यशाचे श्रेय खेमूने मुख्याध्यापक सदानंद मेंढे, वर्गशिक्षक शरद लंजे, केशव कोल्हे, सीपी निपाने, प्रमोद डोंगरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी कोरे, आई वडिलांना दिला.खेमुच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.