गोरेगांव,दि.27: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया च्या वतिने गणित विषयाची प्रज्ञा शोध परिक्षेचे आयोजन गोरेगांव येथील जि.प.केंद्रिय प्राथमिक शाळेत करण्यात आले होते.यात गोरेगांव प.स.अतंर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हिरडामाली येथील इ.चौथीचा राज खुमेंद्रकुमार भगत हा गोरेगांव तालुक्यात प्रथम आला असून तो जिल्हास्तरीय गणित विषयाच्या प्रज्ञा शोध परीक्षेकरीता पात्र ठरलेला आहे.
राने आपल्या यशाचे श्रेय वर्ग शिक्षिका कु.साधना पारधी यांना दिले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष राखीलाल येळे,मुख्याध्यापिका नाननबाई बिसेन ,उपाध्यक्ष महेश कुंभलकर,समीती सदस्य उपसरपंच तेजलाल पटले,शा.व्य.समीती सदस्य प्रा.लोकेश कटरे,दशरथ पटले,चंद्रसेन पटले,सविता बिसेन,वंदना ठाकूर,संगिता मसराम,नंदेश्वरा राऊत,दिपकला बिसेन,उषा राऊत,प्रतिमा घरडे,पदविधर शिक्षक सुरेश बघेले,सौ.छायाताई पारधी,ए.डी.तितिरमारे,वीरेंद्रकुमार पटले,क्रांतीलाल पटले यांनी केले.