बहुउद्देशीय हायस्कूल अर्जुनी/मोरगाव येथे सायकलचे वाटप

0
69

अर्जुनी मोरगाव,दि.29ः-अर्जुनी/मोरगाव येथील बहुउद्देशीय हायस्कूल अर्जुनी/मोरगव या शाळेत मानव विकास योजनेंतर्गत इयत्ता ८ वी तील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांना शाळेकडून निरोप देण्यात आला. प्रसंगी इयत्ता ९ वी कडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ९ वी तील विद्यार्थी अजिंक्य मेश्राम व आदित्य बॅनर्जी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत परीक्षेला समाविष्ट होणार्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता १० वी चे विद्यार्थी सौरभ मेंढे, सुधीर उके, अमन मेश्राम, स्वाती भंडारकर, सौरभ मरकाम, प्रणाली शहारे, दिव्या ढोंगे, आकांक्षा शेंडे, शिवा कनोजे, हेमराज हत्तिमारे, युवराज कोरे यांनी आपापल्या मनोगतातून सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दहावीच्या वर्गशिक्षिका रंजना चुटे यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेचे योग्य नियोजन करुन पेपर सोडवावेत असे सांगीतले. नगरसेविका यमु ब्राम्हणकर, गिता ब्राम्हणकर, मनिषा तरोने, सेवानिवृत्त शिक्षक भाष्कर बांबोळे, सहाय्यक शिक्षक शंभुदेव मुरकुटे, तुलाराम कूंभलवार, संस्थाध्यक्ष ताराराम हुमे यांनी मार्गदर्शन केले. गोंदीया जिल्ह्यातून १०० मिटर धावण्याच्या शर्यतीत यामिनी प्रधान हिने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केल्यामुळे उपस्थीत पाहुण्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पालक लिलाधर शेंडे, खुशाल हातझाडे उपस्थीत होते. मुख्याद्यापिका माधवी हुमे यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सुधाकर फुंडे, यादव हुमे, सचिदानंद परतेकी, विश्लेष मेश्राम, मोरेश्वर बोकड़े, उर्मिला हुमे, कीरण मस्के, आइदान बोरकर, पांडूरंग फाये, रमण शहारे यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन अस्फीया शेख हिने केले तर तृप्ती परतेकी हिने सर्वांचे आभार मानले.