जलसंधारण विभागात पदभरती करण्याचे एनएसयुआयचे मंंत्री राठोडांना निवेदन

0
220

सरकारने लवकरच भरतीचे आदेश जारी करावेत – अमन तिगाला

गोंदिया,दि.२९ – २६ डिसेंबर २०२४ रोजी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी घोषणा केली की महाराष्ट्र सरकारचा मृद आणि जलसंधारण विभाग लवकरच ३००० नवीन पदांची भरती करणार आहे. परंतु ४ महिने उलटूनही महाराष्ट्राच्या महायुती सरकारने कोणत्याही प्रकारचा आदेश जारी केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आणि भरतीबाबत निराशा आहे.

जलसंधारण विभागात लवकरात लवकर ३००० पदांची भरती करण्याची महायुती सरकारकडे मागणी घेऊन, गोंदिया जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमन तिगाला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्र सरकारचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या नावे, जिल्हाधिकारी गोंदिया यांच्यामार्फत निवेदन सादर करून, सरकारला लवकरात लवकर भरतीचे आदेश जारी करण्यास सांगितले आहे. जर सरकारने लवकरच ३००० पदांच्या भरतीचे आदेश जारी केले नाहीत तर एनएसयूआय गोंदिया जिल्हाध्यक्ष अमन तिगाला यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.