SBI भरती २०२० : अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० #SBI bharti 2020

0
71
SBI bharti 2020  – State Bank Of India has announced Advertisement for SBI Clerk Bharti 2020 on the official website (www.sbi.co.in). The published advertisement is inviting applicants for a total of 8134 Junior Associate (Customer Support & Sales) posts. This is the really best opportunity for participants who want to do the job at State Bank Of India.
OFB-Bharti-2020सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ८००० जागांची मेगाभरती निघाली आहे. एसबीआयने लिपिक पदाच्या ८००० जागांची जाहीरात प्रसिद्ध केली आहे.
भारतीय स्टेट बँक येथे कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) / लिपिक पदाच्या एकूण ८१३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० आहे.
हि ८००० जागांची भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. तीन जानेवारी २०२० ते २६ जानेवारी २०२० पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. लिपिक पदासाठी आधी पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी/मार्च २०२० मध्ये पूर्व परीक्षेचं नियोजन करण्यात आले आहे. तर १९ एप्रील २०२० रोजी मुख्य परीक्षा होईल. तसेच एका उमेदवाराला एकाच राज्यात अर्ज करता येणार आहे.
  • पदाचे नाव – कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) / लिपिक
  • पद संख्या – ८१३४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • फीस – खुल्या प्रवर्गाकरिता रु. ७५०/- आहे.
  • अर्ज सुरु होण्याची तरीख – ३ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in
लिपिक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पदवीच्या अखेरच्या वर्षाला असणारा उमेदवारही अर्ज दाखल करू शकतो.  अर्जदाराचं किमान वय २० पूर्ण केलेलं असावं. तर, कमाल वय २८ वर्षे असावं. १ जानेवारी २०२० ही तारीख त्यासाठी आधार म्हणून धरली जाईल. म्हणजेच, २ जानेवारी १९९२ च्या आधी आणि १ जानेवारी २००० नंतर जन्मलेल्यांना अर्ज करता येणार नाही. एससी, एसटी उमेदवारांसाठी वयाची अट ५ वर्षांनी तर, ओबीसींसाठी तीन वर्षांनी शिथील करण्यात आली आहे.
परीक्षा कशी असेल?
पूर्वी आणि मुख्य परीक्षेच्या निकालावर उमेदवारची निवड करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेत एकूण १०० प्रश्न विचारले जातील, त्यासाठी एक तासांचा अवधी असेल. तसेच मुख्य परीक्षेसाठी २०० गुणांसाठी १९० प्रश्न विचारले जातील. त्यासाठी दोन तास ४० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे.