वाशिम, दि. २6 : जनगणना २०२१ करिता तांत्रिक सहाय्यक, बहुकार्य कर्मचारी (एमटीएस स्टाफ) या कंत्राटी पदांकरिता (१८ महिने) वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ फेब्रुवारी २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाच्या १७ फेब्रुवारी २०२० रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार सदर जाहिरात कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. या दोन्ही जाहिराती रद्द करण्यात आल्या आहेत. दोन्ही कंत्राटी पदे भरण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून नियुक्ती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
तांत्रिक सहाय्यक, बहुकार्य कर्मचारी (एमटीएस स्टाफ) या कंत्राटी पदांकरिता आवश्यक पात्रता व निकष www.mahaswayam.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असून ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करावयाचे आहेत, अशा उमेदवारांनी सर्वप्रथम www.mahaswayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच नियमितपणे www.mahaswayam.in या संकेतस्थळाला भेट देवून अद्ययावत माहिती जाणून घ्यावी, असे वाशिम जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.