दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत शिक्षक राजेश कोगदे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

0
11
oplus_1024

बुलढाणा-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत राबविण्यात आलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जि प म उच्च प्राथमिक शाळा कदमापूर ता.खामगाव जि.बुलढाणा येथील शिक्षक राजेश कोगदे यांना जिल्हास्तरावर गणिततील विषयातील नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या व्हिडिओ निर्मिती बद्दल प्रथम क्रमांवाकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा चे प्राचार्य डॉ जे.ओ.भटकर, वरिष्ठ अधिव्याख्याता गायकवाड, डॉ.समाधान डुकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन यावेळी शिक्षक कोगदे यांचा गौरव करण्यात आला.