सालेकसा,दि.14 : पुणे येथे संपन्न झालेल्या मिस महाराष्ट्र सीजन टू 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये गोंदियातील निकिता राजेंद्र भेंडारकर हिने फिल्म इंडस्ट्रीच्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या उपस्थितीत तसेच अनेक कार्पोरेट क्षेत्रातील नामांकित व्यक्तीच्या उपस्थितीत मिस महाराष्ट्र प्रतियोगितामध्ये सर्वाधिक तीन टायटल प्राप्त करून गोंदिया शहरातील पहिली बेटी म्हणून महाराष्ट्रात गोंदियाचा नाव ब्युटी कॉन्टेस्ट स्पर्धेत उंच शिखरावर नेऊन ठेवले. निकिताने मिस महाराष्ट्र स्पर्धांमध्ये तीन महत्त्वपूर्ण पुरस्कार प्राप्त केले. त्यामध्ये मिस ब्युटीफुल वूमन ऑफ द महाराष्ट्र, मिस ग्लॅमरस लूक ऑफ महाराष्ट्र व बेस्ट वुमेन ऑफ द महाराष्ट्र याप्रकारे मिस ब्यूटिफुल कॉन्टॅक्टमध्ये तीन पुरस्कार जिंकणारी गोंदियातील पहिली मुलगी ठरली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदविले आहे. या स्पर्धेचे आयोजन संचालक उद्धव कराड यांनी केले. परीक्षण उर्मिला जाधव, आदित्य सिंह राजपूत, राजगुरू यांनी केले. या ह्यसीजन टूह्णच्या स्पर्धेकरिता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शहरांमध्ये ऑडिशन कार्यक्रमाच्या आयोजनामधून पन्नास सौंदर्यवतींची निवड करण्यात आली होती. या पन्नास सौंदर्यवतींना पुण्यातील ग्रॅण्ड फिनाले स्पर्धेत गोंदिया शहरातील निकिता भेंडारकर हिची सर्वाधिक तीन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. निकिताने डी.बी. सायन्स कॉलेज गोंदियामधून बीएससी केल्यानंतर शिवाजी सायन्स कॉलेज नागपूर येथून एम.एस.सी. रसायनशास्त्रची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असून निकिताची याशिवाय विशेष आवड बॅडमिंटन, फॅशन व समाजसेवा यामध्ये आहे. निकिताने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, गुरुजन व मित्रपरिवारांना दिले.