परभणी : भांडणातुन झालेल्या वादात दोन समाजातील गट समोरा समोर आले. त्यांच्यात तुफान दगडफेक झाली. यामध्ये जवळपास २० दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले तर काही जन जखमी झाले आहेत.
ही (Parbhani Stone pelting) घटना शनिवार १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून सध्या परिसरात तनावपुर्ण शांतता आहे. परभणी शहरातील इकबाल नगरामध्ये उद्यान आहे. या ठिकाणी सायंकाळच्या सुमारा लहान मुलांमध्ये वाद झाला. परिसरातील लोकप्रतिनिधींनी दोन्ही समाजाकडील लोकांची समजुत घालत वाद मिटवीला. त्यानंतर सायंकाळी
७:३० च्या सुमारास या भागात दोन्ही गटामध्ये तुफान दगडफेक झाली. या (Parbhani Stone pelting) दगडफेकीत दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. घरावर देखील दगडफेक करत काचा फोडण्यात आल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले. या दगडफेकीत काही जन जखमी झाले आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीव्र ही दगडफेक करण्यात आली आहे. सध्या या परिसरात तनावपुर्ण शांतता आहे.
शांतता राखण्याचे आवाहन
घटनेची माहिती समजताच पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे घटनास्थळी दाखल झाले. (Parbhani Stone pelting) शहरातील नवा मोंढा, नानलपेठ, कोतवाली, ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी देखील घटनास्थाळी आले. स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी देखील दाखल झाले. सध्या परिस्थती नियंत्रणात आहे. नागरीकांनी शांतता राखावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर शनिवारी रात्रीपासून पोलीस बंदोबस्त सदरील ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे.