परभणी शहरात बंदची हाक; प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

0
17
परभणी, दि. 2४ : काश्मीरमधील पहलगाम येथील अमानुष घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी परभणी शहरात 24 एप्रिल रोजी विविध संघटनांच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद शांततेत पार पडावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. काळे बोलत होते. त्यांनी नागरिकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था राखावी, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
बैठकीस अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोन्सीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशा गरुड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिल पोलास, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. कल्याण कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता राखून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.