जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्याकडून धाराशिव नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी

0
25
धाराशिव,२७ एप्रिल -धाराशिव येथील नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार यांनी आज २७ एप्रिल रोजी केली.या पाहणीदरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मेकॅनिकल इंजिनिअर श्री.थोरबोले, डेपो मॅनेजर श्री.भांगे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी बस स्थानकाच्या कामाची सविस्तर पाहणी केली आणि बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.पाहणीच्या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत कामाच्या गुणवत्तेबाबत चर्चा केली आणि आवश्यक सुधारणा व कामाच्या गतीसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.यामुळे बस स्थानकाच्या विकासकामांना आवश्यक वेग व गुणवत्ता मिळण्यास मदत होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.