नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.25ः- एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या ५५ जागा रिक्त होणार आहेत. या जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून ही निवडणूक जाहीर केली आहे.
१७ राज्यातील ५५ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या तारखांना या जागा रिक्त होणार आहेत. ६ मार्च रोजी या निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. १३ मार्च रोजी नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. तसेच २६ मार्च रोजी मतदान घेतले जाईल.
राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोतीलाल वोरा तसेच भाजपचे माजी केंद्री मंत्री विजय गोयल यांचा कार्यकाळ संपणार आहे.