तिरोडा,दि.25ःयेथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरोड़ा शहर कॉग्रेस उपाध्यक्ष मनोहर श्रीराम तरारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून राजेंद्र जैन यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरुन पक्षात स्वागत करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, अविनाश जायसवाल, अजय गौर, राजेश गुनेरिया, डी. यू. राहंगडाले, राजु एन जैन, विजय बुराडे, विजय बंसोड, मुकेश बरियेकर, प्रभु असाटी, सलीम जवेरी, नागेश तरारे, अमित बारेवार, सचिन शेंडे, शैलेश वासनिक, लखन बहेलिया, संजीव रॉय, शैलेश वासनिक, लव माटे, मोनु मोरकर सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.