तिरोडा तालुकाच्या वतीने बूथ कमेटी सक्षमीकरणाला प्रारंभ

0
20

तिरोडा- तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक सिंधी समाज भवन, तिरोडा येथे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, जिल्हा बूथ प्रमुख नरेश माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या बैठकीमध्ये खा. प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तालुक्याच्या वतीने सत्कार समारंभ पूर्व नियोजन संबंधी चर्चा करून आढावा घेण्यात आला. तिरोडा तालुक्यातील प्रत्येक बुथवर क्रियाशील व सक्षम कार्यकर्त्यांची निवड करून प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना मिळून काम करायचे आहे. त्यासाठी पक्षात युवक, युवती व महिलांना स्थान देऊन प्रोत्साहन द्यावे. प्रत्येक बुथवर काम करेल अश्याच उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देऊन तालुक्यातील प्रत्येक बुथ निहाय्य सक्रिय व क्रियाशील प्रमुखाची निवड करण्यात यावी यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. याबैठकीत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय बूथ प्रमुखांची नियुक्ती करून पक्षश्रेष्ठी कडून जबाबदारी सोपविण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, राजलक्ष्मी तूरकर डॉ. अविनाश जयस्वाल, प्रेमकुमार रहांगडाले, अजय गौर, रविकांत बोपचे, भोजराज धामेचा, राजेश गुनेरिया, प्रभू असाटी, प्रशांत डहाट, जगदिश कटरे, नागेश तरारे, ओमप्रकाश येरपुडे, नरेश असाटी, राजकुमार केशरवानी, ममता बैस, जगदीश बावनथडे, किरण पारधी, वाय टी कटरे, रिताताई पटले, राजकुमार ठाकरे, डोमळे काकाजी, अल्केश मिश्रा, सविता पटले, छाया टेकाम, वनमाला डाहाके, मनीष पटले, धनीश्वरी ठाकरे, दिव्या पटले, मंदा टेम्भारे, रजनी पेलागडे, दुर्गा रेहकवार, छाया पटले, विजय बिंझाडे, अतुल भांडारकर, किरण बन्सोड, नासिर घाणीवाला, भवानी बैस, विजय बुराडे, मुकेश बरेयकर, सलीम झवेरी, विजय बन्सोड, बबलू ठाकूर, राजेश श्रीरामे, साजन रामटेके, राहुल गहेरवार, डॉ मुकेश पटले, दुर्गेश कळपती, रमेश पटले, राजेश तूरकर, सहेशराव धोंडे, अशोक इंदूरकर, दिलीप भैरम, दीनदयाळ टेम्भरे, राजेश राऊत, संदीप सोनवाने, लीकेश राऊत, सुनील झाडे, बी.पटले, जितेश बोदेले, रामेश्वर रहांगडाले, डॉ गिरीष पारधी, वासुदेव हरिणखेडे, अनिलकुमार राऊत, अमूल राऊत, सुखदासभाऊ, भूपेंद्र पटले, योगेशभाऊ टेम्भरे, वंनदराम साठवणे, नितिन बिसेन, टेकलाल सोनवाने, अशोक भांडारकर, गजानन तिडके, डॉ मोहन पटले, जगन धुर्वे, नाथूलाल अंबुले, साधना पटले, अजय बारापात्रे, परसराम बिसेन, अरविंद येडे, ओमप्रकाश अंबुले, रमेश भोयर, राजेश टेकाम, उमालाल पटले, मच्छिन्द्र टेम्भेकर, प्रशांत चोंडलवार, ओमप्रकाश राहंगडले, विनोद कुकडे, महेश कुकडे, प्रभुदयाल बिसेन, भोजराज उईके, तुळशीदास जांभुळकर, दिनेश बोदेले, विठ्ठल पटले, रवींद्र बर्वे, दिलीप भैरम बालकंदास कुंभरे, सुखदेव बिसेन, गणराज बिसेन, संजय चुटे, छोटेलाल बिसेन, सुधाकर मेश्राम , प्रेमलाल पारधी, राजू दमाहे, अरुण भुरे, किसनकुमार पारधी, आशिष चौधरी, नवीन साखरवाडे, रवी पटले, धर्मराज पटले, वासुदेव वैद्य, ताराचंद नखाते, राजकुमार उईके, किशीर कुंभरे, खेमराज पटले, खुशाल बोपचे, महेश पटले सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.